मध्य रेल्वेवरील प्रवाशांची एटीव्हीएम तिकीट विक्रीला पसंती


SHARE

लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळेत लोकल पकडावी लागते. परंतु, अनेकदा तिकीट खिडक्यांवर असलेल्या प्रचंड रांगेमुळं प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यामुळं रेल्वे प्रशासनानं रेल्वे प्रवाशांची लोकल प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी एटीव्हीएम मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली. दरम्यान, सुविधेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, एटीव्हीएम मशीनमधून तिकिटं घेण्याकडं कल जास्त आहे. मध्य रेल्वेवरील रोजच्या १० लाख रेल्वे तिकिटांपैकी ३ लाख तिकीटविक्री ही एटीव्हीएममधून होत असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.

३० टक्के तिकिटांची विक्री

मध्य रेल्वे मार्गावरील होणाऱ्या तिकीट विक्रींपैकी सुमारे ३० टक्के तिकिटांची विक्री एटीव्हीएममधून होतेतर तिकीट खिडक्यांवरून सुमारे ६० टक्केजनसाधारण तिकीटविक्री (अधिकृत एजंटकेंद्रावरून १३ टक्के आणि मोबाइल-इंटरनेटवरून ५ टक्के तिकीटविक्री होतेएटीव्हीएम तिकीटविक्री वाढवण्यासाठी अनेक रेल्वे स्थानकांवर 'स्वयंचलित तिकीट क्षेत्रउभारण्यात आले आहे.

तिकीट उपलब्ध

रेल्वे प्रशासनानं स्थानकांवर तिकीट खिडक्यांसह एटीव्हीएम मशिन, बारकोड स्कॅन, मोबाइल तिकिटे (पेपरलेस) या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या एटीव्हीएममध्ये मार्ग, स्थानक, दर्जा निवडल्यास अवघ्या १० ते २० सेकंदात तिकीट उपलब्ध होते. स्मार्ट कार्डमुळं सुट्ट्या पैशांची गरज भासत नाही. त्यामुळं तिकिटांच्या अन्य पर्यायांपैकी एटीव्हीएम यंत्रणा प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरत आहे.


हेही वाचा -


संबंधित विषय
ताज्या बातम्या