Advertisement

राज ठाकरे म्हणाले...PMC बँक घोटाळ्यावर बोलतच राहणार!

आर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेल्या पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँके (PMC)च्या खातेदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी भेट घेतली.

राज ठाकरे म्हणाले...PMC बँक घोटाळ्यावर बोलतच राहणार!
SHARES

आर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेल्या पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँके (PMC)च्या खातेदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी भेट घेतली. याप्रकरणी मध्यस्ती करण्याची विनंती राज यांना खातेदारांनी केल्यावर खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचं तसंच निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळ्यावर बोलण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे व मनसेचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते.


अडचणींचा पाढा

पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर सध्या निर्बंध आहेत. खातेदारांना ६ महिन्यांतून केवळ २५ हजार रुपये काढण्याचीच अनुमती आहे. त्यामुळं शेकडो खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकून पडले आहेत. परिणामी काहींना लग्नकार्यं पुढं ढकलावी लागत आहेत. तर, काहींना उपचारांवर पैसे खर्च करणं अवघड झालं आहे. प्रत्येक खातेदाराची वेगळी अडचण आहे. त्यातच राज ठाकरेंनी आपल्या भाषणात पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केल्याने खातेदारांनी त्यांना भेटून आपल्यापुढील अडचणी सांगितल्या.



दिलं आश्वासन

राज यांनी खातेदारांचं म्हणणं ऐकून घेत 'पीएमसी घोटाळ्यावर मी प्रत्येक भाषणात बोलतोच आहे. यापुढंही बोलत राहीन आणि निवडणुकीनंतर या प्रश्नी पाठपुरावा करेन,' असं आश्वासन दिल्याचं शर्मिला ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.

मुख्यमंत्र्यांपुढं निदर्शने

दरम्यान निवडणूक प्रचारासाठी ठाण्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर निदर्शनं करून खातेदारांनी घोटाळेबाजांच्या अटकेची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी निदर्शकांची भेट घेत कारवाईचं आश्वासन दिलं. 



हेही वाचा- 

विरोधी पक्षाची राज ठाकरेंची भूमिका वास्तववादी, सुनील तटकरेंनी केलं कौतुक

PMC बँकेच्या ठेवीदारांचा मोठा निर्णय, पैसे वाचवण्यासाठी RBI पुढं ठेवला ‘हा’ प्रस्ताव



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा