Advertisement

विरोधी पक्षाची राज ठाकरेंची भूमिका वास्तववादी, सुनील तटकरेंनी केलं कौतुक

सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात सशक्त विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. त्यामुळे मला प्रबळ विरोध पक्ष बनवा असं आवाहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पहिल्याच प्रचार सभेत केलं.

विरोधी पक्षाची राज ठाकरेंची भूमिका वास्तववादी, सुनील तटकरेंनी केलं कौतुक
SHARES

सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात सशक्त विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. त्यामुळे मला प्रबळ विरोध पक्ष बनवा असं आवाहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पहिल्याच प्रचार सभेत केलं. यावर एका बाजूला आश्चर्य व्यक्त होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी राज यांच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं आहे. 

काय म्हणाले होते राज ठाकरे?

सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाही. पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करू शकतो. म्हणूनच इतिहासात कुणीच अशी मागणी केली नसेल, जी करतोय ती म्हणजे, तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मला प्रबळ विरोधी पक्ष बनवा. माझा आवाका मला ठाऊक आहे. त्यामुळे मला सक्षम विरोधी पक्ष बनवा. जेव्हा सत्ता मागायची वेळ येईल तेव्हा मी सत्ताही मागेन असं राज ठाकरे म्हणाले होते.  

त्यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले की, राज ठाकरे यांचे पाय जमिनीवर आहेत. कारण आपले किती उमेदवार निवडणुकीला उभे आहेत आणि त्यापैकी किती निवडून येऊ शकतात, हे त्यांचं गणित त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यांना सक्षम विरोधी पक्ष द्यायचा आहे. त्यामुळे त्यांची भूमिका स्वच्छ आणि वस्तुस्थितीवर आधारीत आहे.

१२४ जागांमध्ये मुख्यमंत्री कसा?

याउलट १२४ जागांवर लढणारी शिवसेना स्वबळावर मुख्यमंत्री बसवण्याची भाषा करत आहेत. स्वबळावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी १४५ आमदारांची गरज असताना, एवढ्या कमी जागा लढून शिवसेना कसा काय मुख्यमंत्री बनवेल, हा प्रश्नच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.



हेही वाचा-

राज ठाकरे आळशी, प्रा. दीपक पवार यांचं राजकीय विश्लेषण

शिवसेना-भाजपचा वेगवेगळा जाहीरनामा, ‘या’ तारखेला होणार प्रसिद्ध



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा