राज ठाकरे आळशी, प्रा. दीपक पवार यांचं राजकीय विश्लेषण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राजकीयदृष्ट्या आळशी असल्याचं विश्लेषण मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक दीपक पवार यांनी केलं आहे.

राज ठाकरे आळशी, प्रा. दीपक पवार यांचं राजकीय विश्लेषण
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राजकीयदृष्ट्या आळशी असल्याचं विश्लेषण मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक दीपक पवार यांनी केलं आहे.

खूप अपेक्षा

पवार यांनी राज यांच्या राजकीय वाटचालीचं परखड विश्लेषण करताना म्हटलं आहे की, २००६ मध्ये राज ठाकरे यांनी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा त्यांच्याकडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा होत्या. मला जीन्स घातलेला शेतकरी बघायचा आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. लोकप्रियतेच्या वाऱ्यावर स्वार होत २००९ मध्ये पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते.

पवारांचा टोमणा

पण या आमदारांनी पुढच्या ५ वर्षांत किंवा २०१४ पर्यंत मराठीच्या विकासासाठी किती कष्ट घेतले. विधानसभेत मराठीसंदर्भात किती प्रश्न उपस्थित केले, हा संशोधनाचा विषय असल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या ८९ व्या वर्षीही दिवसाला ३ ते ४ सभा घेतात. तर राज ठाकरे पन्नाशीतही निवडणुकीच्या काळातही १० ते १२ च सभा घेतात. हे राज यांच्या राजकीय आळशीपणाचं उत्तम उदाहरण आहे.

राजकारण करायचं झाल्यास सकाळी लवकर उठावं लागतं आणि रात्री उशीरापर्यंत जागावं लागतं, असा टोमणा राज ठाकरेंना लगावला होता. याची आठवणही पवार यांनी करून दिली.हेही वाचा-

शिवसेना युतीत सडली आणि १२४ वर अडली- राज ठाकरे

मला सत्ता नको, प्रबळ विरोधी पक्ष बनवा- राज ठाकरेसंबंधित विषय