Advertisement

शिवसेना-भाजपचा वेगवेगळा जाहीरनामा, ‘या’ तारखेला होणार प्रसिद्ध

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीप्रमाणे एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याऐवजी शिवसेना आणि भाजप वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे.

शिवसेना-भाजपचा वेगवेगळा जाहीरनामा, ‘या’ तारखेला होणार प्रसिद्ध
SHARES

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीप्रमाणे एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याऐवजी शिवसेना आणि भाजप वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. शनिवार १२ आॅक्टोबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचा, तर मंगळवार १५ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. यावेळी भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील इ. नेते उपस्थित असतील.

काय असेल जाहीरनाम्यात?

शिवसेनेच्या जाहीरनाम्यात काय असू शकेल, याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्यातील भाषणादरम्यान आधीच दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफी, शेतकरी विमा योजना, उद्योगधंदे- रोजगारासाठी विशेष योजना, शिक्षण-आरोग्यासाठी विशेष योजना, महिला सक्षमीकरणावर भर, वरिष्ठ नागरिकांसाठी योजना, विद्यार्थ्यांना वाहतुकीत सवलत आणि जाहीरनाम्यातील वैशिष्ट्य असलेल्या १० रुपयांमध्ये सकस आहार योजनेचा समावेश असू शकेल.

हेही वाचा- आघाडीच्या शपथनाम्यात ८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या

आघाडीचा जाहीरनामा आधीच

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने आपला जाहीरनामा (शपथनामा) आधीच प्रसिद्ध केला आहे. या 'शपथनाम्यात' शेती-उद्योग, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरणाच्या मुद्द्यांवर आश्वासने देण्यात आली आहेत. तसंच तरूण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. 

बेरोजगार तरुणांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता, स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान, राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा, कामगारांना किमान २१ हजार वेतन, स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ, सर्व महापालिका हद्दीतील ५०० चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी, ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान इ. आश्वासने या जाहीरनाम्यातून देण्यात आली आहेत.


हेही वाचा-

राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला, एवढा आहे कर्जाचा आकडा

शिवसेना देणार १० रुपयांत भरपेट जेवण, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून घोषणांची जंत्री

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा