आघाडीच्या शपथनाम्यात ८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीने सोमवारी आपला जाहीरनामा अर्थात 'शपथनामा' सादर केला. या 'शपथनाम्यात' शेती-उद्योग, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरणाच्या मुद्द्यांवर आश्वासने देण्यात आली.

SHARE

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीने सोमवारी आपला जाहीरनामा अर्थात 'शपथनामा' सादर केला. या 'शपथनाम्यात' शेती-उद्योग, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरणाच्या मुद्द्यांवर आश्वासने देण्यात आली आहेत. तसंच तरूण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, असे नेते उपस्थित होते.

थोरात आणि पाटील यांनी एकत्रितरित्या जाहीरनामा सादर केला. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास तसंच १७ शाश्वत विकास उद्दिष्टांच्या’ अंमलबजावणीसाठी काँग्रेस आघाडी वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी त्यांनी सांगितलं.

हा जाहीरनामा तयार करण्यासाठी आघाडीच्यावतीने एक समिती तयार करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या खा. वंदना चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुनगेकर यांचा समावेश होता.

काय आहेत आश्वासनं?

 • बेरोजगार तरुणांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता 
 • स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान 
 • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी  
 • शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण
 • उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शिक्षण कर्ज
 • राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा
 • कामगारांना किमान २१ हजार वेतन
 • स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ
 • सर्व महापालिका हद्दीतील ५०० चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी
 • ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान  
 • दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव
 • जात पडताळणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणार
 • उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखणार
 • निम अंतर्गत कामगारांना पूर्णवेळ कामगारांचा दर्जा देणारहेही वाचा-

भाजपची ‘अडचण’ समजून युती केली- उद्धव ठाकरे

Shiv Smarak Scam: भाजपच्या भ्रष्टाचाराचा ‘असा’ केला भांडाफोड- सचिन सावंतसंबंधित विषय
ताज्या बातम्या