Advertisement

भाजपची ‘अडचण’ समजून युती केली- उद्धव ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीत युती करताना शिवसेनेने कुठलीही तडजोड केलेली नाही. तर भाजपची अडचण समजून घेत १२४ जागांवर लढण्याचं शिवसेनेने ठरवलं आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीतील जागावाटपाचं विश्लेषण केलं.

भाजपची ‘अडचण’ समजून युती केली- उद्धव ठाकरे
SHARES

आगामी विधानसभा निवडणुकीत युती करताना शिवसेनेने कुठलीही तडजोड केलेली नाही. तर भाजपची अडचण समजून घेत १२४ जागांवर लढण्याचं शिवसेनेने ठरवलं आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीतील जागावाटपाचं विश्लेषण केलं. 'सामना ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करताना चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. शिवसेना अधिक जागा मिळाव्यात यासाठी आग्रही होती. परंतु भाजपच्या दबावापुढं शिवसेनेचं काहीही चाललं नाही. शिवसेना झुकल्याने अखेरच्या क्षणी युती झाली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  त्याच अनुषंगानं संजय राऊत यांनी उद्धव यांना प्रश्न विचारला होता.  

यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने १२४ जागा घेऊन कुठलीही तडजोड केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमची अडचण समजून घ्या, अशी सातत्याने विनंती करत होते. त्यांची ही अडचण मी समजून घेतली.
१२४ जागा हा शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासात विधानसभेला लढवलेल्या जागांपैकी सर्वात कमी आकडा आहे. विधानसभा निवडणुकीत युती करताना कमी जागा घेऊन शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागली, असं म्हटलं जात आहे.

यावर प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे म्हणाले, एकाकी लढायचं असेल तर शिवसेना कधीही लढू शकते. युतीतील जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा आल्याचं आता दिसत असलं तरी हे चित्र तात्कालिक आहे. जागांचा आकडा लहान असला तरी आमदारांचा आकडा मोठा असेल. शिवसेनेच्या इतिहासातील सर्वाधिक आमदार यावेळी निवडून येतील. शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असेल,' असा विश्वास उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला.



हेही वाचा-

राज्यभरात ८०० उमेदवारांचे अर्ज बाद

भाजपची चौथी यादी जाहीर; विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित यांचा पत्ता कट



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा