Advertisement

सीएसएमटी स्थानकात क्यूआर कोड आधारित स्वयंचलित दरवाजे

प्रवाशांकडे असलेलं तिकिट कायदेशीर असेल तरच प्रवेश दिला जाणार आहे.

सीएसएमटी स्थानकात क्यूआर कोड आधारित स्वयंचलित दरवाजे
SHARES

मध्य रेल्वे (central railway) प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) इथं क्यूआर कोड-आधारित स्वयंचलित दरवाजे (automated doors)बसविण्याचं काम पूर्ण केलं आहे. एकूण ५ क्यूआर कोड-आधारित स्वयंचलित फ्लॅप-सक्षम एन्ट्री पॉइंट प्रदान केले गेले आहेत. या दरवाजाच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवाशांकडे असलेलं तिकिट कायदेशीर असेल तरच प्रवेश दिला जाणार आहे.

स्थानकांवर जास्त गर्दी होऊ नये म्हणून क्यूआर कोड सिस्टम बसविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) नंतर मुंबईच्या चर्चगेटवर हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविला जाणार आहे. मुंबईतील सर्व स्थानकांवर बसविण्यात येणार असून, यामुळं प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवणं सोपं होणार आहे.

बेस्ट प्रशासनानं ही आपल्या प्रवाशांसाठी क्यूआर कोडची पद्धत वापरी आहे. बेस्टनं जुलै महिन्यापासून क्यूआर कोडची सुविधा प्रवाशांना दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा