Advertisement

मोबाइल अॅपवरून होणार हमालांची बुकींग

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन मोबाईल युटीएस अॅपची सुविधा उफलब्ध करून दिली. मात्र, रेल्वे तिकीटांप्रमाणे प्रवाशांना आता हमालांची देखील बुकींग करता येणार आहे.

मोबाइल अॅपवरून होणार हमालांची बुकींग
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन मोबाईल युटीएस अॅपची सुविधा उफलब्ध करून दिली. मात्र, रेल्वे तिकीटांप्रमाणे प्रवाशांना आता हमालांची देखील बुकींग करता येणार आहे. रेल्वे स्थानकांत असलेल्या हमालांकडून अनेकदा मनमानी शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत मध्य रेल्वेनं अॅपद्वारे हमालांचं बुकींग करण्याचा निर्णय घेतला आहे. 'यात्री' असं या अॅपचं नाव असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये एकूण ३०० हमाल असून त्या सर्वांना या अॅपशी जोडलं जाणार आहे.

जास्तीचं सामान

लांबचा प्रवास करणारे प्रवासी जास्तीचं सामान घेऊन जातात. जास्तीचं सामान असल्यामुळं प्रवासी हमालांची मदत  घेतात, मात्र काही हमाल मनमानी पद्धतीनं प्रवाशांकडून शुल्क आकारतात. या शुल्क आकारणीवरून अनेक हमाल प्रवाशांशी हुज्जतही घालतात. त्याबाबतच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडं करण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय, हमाल म्हणून नोंद नसताना देखील काही जण सामान वाहून नेतात. त्यामुळं प्रत्येक हमालाला बायोमॅट्रीक कार्ड देण्यात येणार आहे.

केवळ नोंदणीकृत हमालांनाच हे काम मिळावं म्हणून हे कार्ड देण्यात येत असल्याची माहिती मिळते. ओला-उबरच्या धर्तीवरच हे अॅप तयार करण्यात येणार आहे. त्यात सामान कुठपर्यंत वाहून न्यायचं, त्याची संख्या आणि वजन याबाबतची माहिती विचारून शुल्क आकारण्यात येणार आहे.



हेही वाचा -

अभिजीत बिचुकले बिग बाॅसच्या घरात परतणार?

अधिवेशनासाठी विशेष असणाऱ्या बोगीमधून चोरी, आमदारांची कागदपत्रं चोरीला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा