अधिवेशनासाठी विशेष असणाऱ्या बोगीमधून चोरी, आमदारांची कागदपत्रं चोरीला

राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी एक्स्प्रेसनं मुंबईला येणाऱ्या आमदारांच्या बॅगांवर चोरांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

अधिवेशनासाठी विशेष असणाऱ्या बोगीमधून चोरी, आमदारांची कागदपत्रं चोरीला
SHARES

राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी एक्स्प्रेसनं मुंबईला येणाऱ्या आमदारांच्या बॅगांवर चोरांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. सोमवारी देवगिरी एक्स्प्रेसमध्ये शिवसेनेच्या २ तर मंगळवारी राहुल बोंद्रे यांना चोरांनी लुटल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत आमदारांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

चोराला पकडण्यात अपयश

बुलढाण्यातील चिखली मतदारसंघातील आमदार राहुल बोंद्रे मलकापूर येथून विदर्भ एक्सप्रेसनं कल्याणला आले. त्यावेळी त्यांच्या पत्नी वृषाली बोंद्रे यादेखील त्यांच्यासोबत प्रवास करत होत्या. बोंद्रे हे सकाळी ७ वाजताच्या सुमारास मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात उतरले असता, त्यांच्याकडील महत्वाच्या कागदपत्रांची फाईल चोरट्यानं चोरली. तसंच, वृषाली बोंद्रे यांची पर्सही चोरट्यानं पळवली. यावेळी आमदार राहुल बोंद्रे यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोर पकडण्यात त्यांना अपयश आलं. या पर्समध्ये २६ हजारांची रोख रक्कम आणि एटीएम कार्ड आणि महत्वाची कागदपत्रं होती. या घटनेनंतर राहुल बेंद्रे यांच्या पत्नीनं तात्काळ मध्य रेल्वेच्या सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

मोबाईस, फाईल, पैसे चोरीला

त्याशिवाय, आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर हे जालना येथून देवगिरी एक्स्प्रेसनं अधिवेशनासाठी मुंबईला पोहचले. रायमूलकर हे कल्याण स्टेशनला उतरणण्यासाठी सकाळी उठले असता त्यांचा मोबाईल आणि खिशातील १० हजार चोरीला गेल्याचं त्यांना समजलं. शशिकांत खेडेकर यांची बॅग असल्याचं समजून चोरट्यानं त्यांच्या पीएची बॅग ब्लेडनं फाडली. धिवेशनासाठी विशेष असणाऱ्या बोगीमधून चोरी झाल्यामुळं आमदार राहुल बोंद्रे,शशिकांत खेडेकर आणि संजय रायमुलकर यांनी सीएसएमटी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.



हेही वाचा -

मराठी अनिवार्य करण्यासाठी एक महिन्यात वटहुकूम काढणार- मुख्यमंत्री

प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा