प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी व अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. सोमवारी संध्याकाळी ही यादी जाहीर झाली आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी व अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. सोमवारी संध्याकाळी ही यादी जाहीर झाली असून, पहिल्या आणि दुसऱ्या यादीप्रमाणं तिसऱ्या यादीत देखील अनेक नामंकित महाविद्यालयांचा कटआॅफ नव्वदीपार राहिला आहे. त्यामुळं ८० ते ८५ टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळणं अशक्य झालं आहे.

वाणिज्य शाखेत चढाओढ

महाविद्यालयांच्या ३ गुणवत्ता याद्यांमध्ये यंदा पारंपरिक अभ्यासक्रमांत कला आणि वाणिज्य शाखेत चढाओढ पाहायला मिळाली आहे. तसंच, सेल्फ फायनान्स कोर्सेसची पसंती कायम असल्याचं दिसून येत आहे. पहिल्या २ गुणवत्ता याद्यांमधील कला, वाणिज्य शाखेच्या कटआॅफमध्ये चढाओढ पाहायला मिळाली असली, तरी यंदा पारंपरिक अभ्यासक्रमांत कला शाखेला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

महाविद्यालयांत जागा रिक्त

तिसऱ्या यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता कोणत्या महाविद्यालयांत जागा रिक्त आहेत, याचा प्रवेशासाठी शोध घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय, नामांकित महाविद्यालयांतील कला शाखेच्या जागा दुसऱ्या यादीतच भरल्या गेल्यानं तिसऱ्या यादीत विद्यार्थ्यांना कला शाखेसाठी जागा उपलब्ध नसल्याचं समजतं.

नामांकित महाविद्यालयांना प्राधान्य

वाणिज्य आणि कला शाखेसाठीच्या प्रवेशासाठी अनेक विद्यार्थ्यांनी नामांकित महाविद्यालयांना प्राधान्य दिलं आहे. त्यामुळं इतर छोट्या महाविद्यालयांतील जागा रिक्तच राहिल्या आहेत. या जागांचे प्रवेश आता महाविद्यालयीन स्तरावर होणार असून, त्यासाठी पुन्हा नोंदणी प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

दादर स्थानकाबाहेर भाजी विक्रेत्यानं केला ग्राहकाचा खून

मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका- मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या