मराठी अनिवार्य करण्यासाठी एक महिन्यात वटहुकूम काढणार- मुख्यमंत्री

'मराठी भाषेसाठी आश्वासनं नको, कायदा करा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत 'मराठीच्या भल्यासाठी-मराठीचं व्यासपीठ' अंतर्गत एकत्र आलेल्या २४ संस्थांनी मराठी विषयीच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आझाद मैदान आंदोलन केल.

SHARE

'मराठी भाषेसाठी आश्वासनं नको, कायदा करा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत 'मराठीच्या भल्यासाठी-मराठीचं व्यासपीठ' अंतर्गत एकत्र आलेल्या २४ संस्थांनी मराठी विषयीच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी सोमवारी आझाद मैदान आंदोलन केलं. मराठी साहित्यिक, प्रकाशक, लेखक, शिक्षक, पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक शिष्टमंडळाची भेट घेऊन, मराठी शिक्षण कायद्यासंदर्भात बारावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्यासाठी महिन्याभरात वटहुकूम काढण्याचं आश्वासन दिलं आहे.

२४ संघटना

विधानसभा निवडणुकीपूर्वीचं हे अखेरचे अधिवेशन असल्यामुळं या २४ संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनात राज्यभरातून अनेक मराठीप्रेमी सहभागी झाले होते. यावेळी सोमवारी दुपारीच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांसमोर प्रामुख्यानं ६ मागण्या ठेवण्यात आल्या. यामधील २ मागण्यांवर अधिक चर्चा करण्यात आली. त्यावेळी या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी बारावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्यासाठी एक महिन्यात वटहुकूम काढण्याचा आश्वासन या शिष्टमंडळाला दिलं आहे.

मराठी भाषा भवन

या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात समिती नेमावी. ही समिती चर्चा, विचार-विनिमय करून मगच निर्णयापर्यंत पोहोचेल’, अशी मधु मंगेश कर्णिक यांनी केलेली सूचना देखील मान्य करण्यात आली आहे. त्याशिवाय, मराठी भाषा भवनाच्या निर्मितीसाठी देखील ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं आहे. रंगभवन इथं हे भवन उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मराठीच्या प्रसार-प्रचारासाठी मराठी भाषा प्राधिकरणाचा कायदा करण्याबाबतही सरकार सकारात्मक असल्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.

आंदोलक शिष्टमंडळ

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि समितीचे मानद अध्यक्ष कौतिकराव ढाले-पाटील, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले, समिती कार्यवाह चंद्रशेखर गोखले, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुण्याचे पदाधिकारी मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका वर्षा उसगावकर, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार, साहित्य महामंडळ कार्यवाह डॉ. दादा गोरे, मुख्याध्यापक संघाचे विभागीय कार्याध्यक्ष शंकर पवार, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे प्रतिनिधी सुनील डिसले, मराठा एकीकरण समितीचे प्रमोद मसुरकर आदींचा समावेश होता.हेही वाचा -

दहा रुपयांसाठी भाजी विक्रेत्यानं केला ग्राहकाचा खून

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: न्यायालयानं तिन्ही महिला डॉक्टारांचा जामीन अर्ज फेटाळलासंबंधित विषय
ताज्या बातम्या