Advertisement

Ganeshotsav 2021: गणपतीसाठीच्या विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ

खालील विशेष एक्स्प्रेसच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

Ganeshotsav 2021: गणपतीसाठीच्या विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ
SHARES

रेल्वेनं गणपती विशेष गाड्यांचा विशेष शुल्कासह विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. कालावधीत वाढ केल्यानं गणपती उत्सवासाठी गेलेल्या किंवा जाणाऱ्यांसाठी प्रवास करणं सोईस्कर झालं आहे. खालील एक्स्प्रेसचा विस्तार करण्यात आला आहे. 

  • ०१२६१ पनवेल – चिपळूण १५-०९-२०२१ पर्यंत धावणारी रेल्वे आता दिनांक २०-९-२०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 
  • ०१२६२ चिपळूण – पनवेल विशेष गाडी दिनांक १५-०९-२०२१ पर्यंत धावणारी आता दिनांक २०-०९-२०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • ०१२५७ लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक १४-९-२०२१ पर्यंत धावणारी आता दिनांक १६-०९-२०२१ पर्यंत (एक सेवा) वाढवण्यात आली आहे. 
  • ०१२५८ सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक १५-०९-२०२१ पर्यंत धावणारी आता दिनांक १७-०९-२०२१ पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.
  • ०१२५९ पनवेल – सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक १५-०९-२०२१ पर्यंत धावणारी आता दिनांक १७-०९-२०२१ पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.
  • ०१२६० सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी दिनांक १४-०९-२०२१ पर्यंत धावणारी आता दिनांक १६-०९-२०२१ पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.

विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेत कोणताही बदल होणार नाही. वरील विशेष गाड्यांच्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक १२-०९-२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in  या संकेतस्थळावर सुरू होईल.

वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानका दरम्यान कोविड १९ शी संबंधित एसओपी, सर्व नियमांचे पालन करीत या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी असेल.

सर्व नियम, COVID-19 शी संबंधित एसओपी, बोर्डिंग दरम्यान, प्रवास आणि गंतव्यस्थानावर कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.



हेही वाचा

IRCTC ची पहिली क्रूझ सेवा १८ सप्टेंबरपासून सुरू होणार, 'या' ठिकाणांची करा भ्रमंती

प्रवाशांना बेस्टचे तिकीट आता घरबसल्या मिळणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा