Advertisement

मुंबईत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई आणि ठाण्यात ग्रीन अलर्ट जारी

मुंबईत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता
file photo
SHARES

मुंबईत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, मुंबईत मध्यम ते हलका पाऊस पडू शकतो. आज दुपारी 12:02 वाजता 4.60 मीटरची भरती होण्याची शक्यता आहे. पुन्हा भरती संध्याकाळी 06:05 वाजता येईल, ज्याची उंची 01.85 मीटर पर्यंत असू शकते.

रविवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईमध्ये 9.87 मिमी पावसाची नोंद झाली, तर पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरात 23 मिमी आणि 18.81 मिमी पाऊस झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिली आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई आणि ठाण्यात आज आणि सोमवारी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवत ग्रीन अलर्ट जारी केला आहे. रविवारी, पालघर आणि रायगड या शहराच्या शेजारील जिल्ह्यांसाठी, हवामान विभागाने पिवळा इशारा जारी केला, जो मुसळधार पावसाचे संकेत देतो.

पालिकेने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सातही तलावांमधील पाणीसाठा 15.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी 25 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत तलावाची पातळी सात टक्क्यांहून खाली घसरून 6.49 टक्क्यांवर आली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा