SHARE

चेंबूर - एमएमआरडीएनं कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकची पुरती दुरवस्था झाली आहे. कित्येक दिवसांपासून साफसफाईच झाली नसल्यानं स्कायवॉकवर अनेक ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचला आहे. त्यामुळे इथून जा-ये करणाऱ्यांना अक्षरशः नाक मुठीत धरावं लागतंय. तर संपूर्ण स्कायवॉक पान-गुटखा खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगून गेलाय. या स्कायवॉकचा वापर करणाऱ्यांना दुर्गंधीचा समना करावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी स्कायवॉकवरील निघालेले पेव्हर ब्लॉक बसवले गेले होते. मात्र ते पुन्हा निखळले आहेत. संध्याकाळी या स्कायवॉकवर दिवेही लागत नसल्यानं याचा फायदा गर्दुल्यांना होतो आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या