अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग

 Chembur
अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग
अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग
See all

चेंबूर - चेंबूरच्या हेमू कलानी मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जात आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नवी मुंबईच्या दिशेने येणारे सर्व टँकर या आरसीएफ गेट नंबर 4च्या बाजूलाच उभे केले जातात. याबाबत अनेकदा काही रहिवाशांनी वाहतूक पोलिसांना तक्रार केली, मात्र वाहतूक पोलीस देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. काही टँकर तर चार ते पाच महिन्यांपासून एकाच ठिकाणी उभे आहेत. त्यामुळे अशा टँकरचालकांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील रहिवासी करत आहेत.

Loading Comments