Advertisement

मुंबईत चिकनचे दर वाढले, कारण काय?

मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांकडे चिकनचे दर किलोमागे २२० ते २४० रुपयांपर्यंत वधारले आहेत.

मुंबईत चिकनचे दर वाढले, कारण काय?
SHARES

मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांकडे चिकनचे दर किलोमागे २२० ते २४० रुपयांपर्यंत वधारले आहेत. जानेवारी महिन्यात आलेल्या बर्ड फ्लू रोगामुळे चिकनची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानं दरात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील घाऊक बाजारात कोंबडय़ांची आवक घटल्यानं शनिवारी आणि रविवारी कोंबडय़ांची आवक कमी झाली. त्यामुळे चिकनचे दर वाढले आहेत.

एक महिन्यापूर्वी साधारणपणे किरकोळ स्वरूपात चिकन विक्रीचा दर १६० रुपये किलो होता. तर १५ दिवसांपूर्वी १८० रुपयापर्यंत पोहचला होता. आठवडाभरापासून हा दर वाढून २२० रुपयापर्यंत पोहचला आहे. मालाची कमतरता राहिल्यास आणखी दर वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या साथीमुळे पोल्ट्री व्यावसायाला मोठा फटका बसला होता. बाजारात चिकनच्या दरात मोठी घट झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुमारास चिकनचे दर काहीसे वाढले. मात्र, ‘जानेवारी महिन्यात आलेल्या बर्ड फ्लू रोगाच्या साथीने चिकनची मागणी पुन्हा घटली होती. त्यावेळी पोल्ट्री व्यावसायिकांकडील कोंबडय़ा विकल्या गेल्या नाहीत. त्याचबरोबर बर्ड फ्लूच्या धास्तीने अनेकांनी पोल्ट्रीमध्ये नवीन पिल्ले आणली नाहीत.



हेही वाचा -

बापरे! अक्षय कुमारनंतर तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण

Maharashtra Weekend Lockdown : काय सुरू काय बंद? जाणून घ्या!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा