Advertisement

निर्बंध नको असतील तर मास्क वापरा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईकरांना आवाहन केलं आहे.

निर्बंध नको असतील तर मास्क वापरा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. रुग्णांचा वाढता आकडा पाहता राज्य सरकारकसोबतच पालिका देखील पुन्हा कामाला लागली आहे. यासंदर्भात गुरुवारी टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली.

यावेळू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे, राज्य सरकार पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे.

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

टास्क फोर्समधील डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचा देखील वाढून ३ टक्के झाला आहे असेही ते म्हणाले.

कोरोना कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना उद्धव यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबई पोलिसांच 'ऑपरेशन मुस्कान', जाणून घ्या मोहिमेसंदर्भात सर्व माहिती

दहिसरमध्ये पाळीव प्राण्यांसाठी पालिकेची पहिली स्मशानभूमी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा