Advertisement

दहिसरमध्ये पाळीव प्राण्यांसाठी पालिकेची पहिली स्मशानभूमी

दहिसरमध्ये स्मशानभूमी उभारण्यात येणार असून यासाठी पालिका 25 लाख रुपयाचा निधी खर्च करत आहे.

दहिसरमध्ये पाळीव प्राण्यांसाठी पालिकेची पहिली स्मशानभूमी
SHARES

मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी ( First Cemetery for Pets in Mumbai ) उभारण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये ही स्मशानभूमी सुरू होण्याची अपेक्षा आहे. दहिसर येथे पाहिली स्मशान भूमी उभारली जात आहे. या स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी असणार आहे.

प्राण्यांसाठी ही पहिलीच स्मशानभूमी असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( mumbai mayor kishori pednekar ) यांनी दिली.

दहिसर विभागाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे दहिसर येथे पाळीव प्राण्यांसाठी पहिली स्मशान भूमी उभी राहणार आहे. याचे सादरीकरण आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थित महापौर बंगल्यावर करण्यात आले.

यावेळी महापौर म्हणाले की, सर्वच राजकीय पक्ष मतदारनसाठी काम करतात. मात्र आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मुक्या प्राण्यांवर काम करण्याचे शिकवले आहे. त्याचंच एक भाग म्हणून अभिषेक आणि त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी पाठपुरावा केल्यावर दहिसर स्मशान भूमीत पाळीव प्राण्यांसाठी पहिली स्मशानभूमी उभी राहत आहे. त्यासाठी २५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही स्मशानभूमी पूर्णता इलेकट्रीक असणार असल्याने त्यापासून प्रदूषण होणार नाही.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून प्रदूषणमुक्त आणि प्राणायनाची स्मशान भूमी असल्याची कोणतीही जाणीव होणार नाही अशी स्मशानभूमी बनवली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

पश्चिम उपनगरात एखादा प्राणी मृत्यू पावल्यास खादी ग्राम उद्योग या संस्थेकडून त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जातात. प्राण्यांसाठी खासगी स्मशानभूमी आहेत. मात्र पालिकेची स्मशानभूमी नव्हती. आता पालिकेककडून पहिली स्मशान भूमी उभारली जात आहे.

२५०० चौरस फूट जागेत हि स्मशानभूमी असणार आहे. येत्या आर्थिक वर्षापासून पालिकेच्या सात विभागात अशा प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली



हेही वाचा

दोन-तीन दिवसांत मान्सून कोकणात, मुंबईत कधी? वाचा सविस्तर...

#NoHonkDay: प्रत्येक बुधवार असणार "नो हॉंकींग डे", मुंबई पोलिसांचा पुढाकार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा