Advertisement

दोन-तीन दिवसांत मान्सून कोकणात, मुंबईत कधी? वाचा सविस्तर...

यापूर्वी राज्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला होता.

दोन-तीन दिवसांत मान्सून कोकणात, मुंबईत कधी? वाचा सविस्तर...
SHARES

मान्सून (Monsoon) पुढच्या दोन दिवसांत कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. केरळपासून नंतर कर्नाटकपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे दोन दिवसांत तो गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

असं असलं तरी मुंबईकरांना (Mumbai) मात्र आणखी आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सून 10 जूननंतरच मुंबईत (Mumbai Rains) येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

देशाच्या बहुतांश भागात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं (IMD) आधीच व्यक्त केला आहे. यंदा 106 टक्के पाऊस यंदा अपेक्षित आहे, तर उत्तर-पूर्व भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. IMD ने 29 मे रोजी जाहीर केले होते की नैऋत्य मान्सून 1 जून रोजी नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी रविवारी केरळमध्ये पोहोचला आहे.

हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात आहे. कर्नाटकचा आणखी काही भाग, कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, प.म. बंगालचा उपसागर, ई. बंगालचा उपसागर, ईशान्येमधील राज्ये, सिक्कीममध्ये पुढील 2 दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे

राज्यातील काही भाग वगळता मान्सून अद्याप दाखल झालेला नाही. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. मान्सूनचा पाऊस २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. मात्र, अनुकूल परिस्थिती असल्याने मान्सूनने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे कोकण आणि गोव्यात मोसमी पाऊस लवकर पडण्याची चिन्हे असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि परभणी परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या पावसामुळे नागरिकांना काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा

पावसाळ्यानिमित्त MMRDA कडून कंट्रोल रुम्सची स्थापना, 'इथे' करा संपर्क

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा