मिलिंद म्हैसकर यांची म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्षपदी नियुक्ती

 Mumbai
मिलिंद म्हैसकर यांची म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्षपदी नियुक्ती

राज्य सरकारने बुधवारी पाच सनदी अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली असून मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव असलेले आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर (बॅच-1992) यांची म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचसोबत अहमदनगर महापालिकेचे आयुक्त बी. डी. गावडे (बॅच-2007) यांची बदली नाशिकमधील आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर जी. सी. मांगले (बॅच-2007) यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मांगले यापूर्वी नंदूरबारमधील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

तसेच, अहमदनगरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे (बॅच-2012) यांची नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी व्ही. व्ही. माने (बॅच-2009) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading Comments