बालसुधारगृहातील कर्मचारी अंदोलनाच्या तयारीत


बालसुधारगृहातील कर्मचारी अंदोलनाच्या तयारीत
SHARES

गरीब आणि अनाथ मुलांसाठी काम करत असलेल्या 'चिल्ड्रेन्स एड सोसायटी'कडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत 'चिल्ड्रेन्स एड सोसायटी'चे आठ बालसुधारगृह असून यामध्ये एक हजारपेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे येथील कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. परिणामी बालसुधारगृह कर्मचारी संघटनेने येत्या सोमवारपासून निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनादरम्यान कर्मचारी दंडाला काळी फीत बांधून सरकारचा निषेध करणार आहेत.

प्रत्येक महिन्याला नियमित वेतन मिळावे, संस्थेच्या मुख्याधिकारी पदावर नियमित नेमणूक व्हावी, तसेच विद्यमान मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कामाची चौकशी व्हावी, आदी मागण्यांसाठी कर्मचारी काळी फीत बांधून हे आंदोलन करणार आहेत.

बालसुधारगृहात अनेक मुलांना चालता येत नाही. अथवा काही मुलांना खाताही येत नाही. कामबंद आंदोलन केल्यास त्याचा फटका येथील मुलांना बसेल. त्यामुळे काम बंद आंदोलन न करता शासनाचा निषेध करण्यासाठी केवळ काळ्या फिती बांधून काम करणार असल्याची माहिती 'चिल्ड्रेन्स एड सोसायटी एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी दिली.

संबंधित विषय