वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घाला वळसा

 Lal Dongar
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घाला वळसा
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घाला वळसा
See all

सुमननगर- चेंबूरच्या सुमननगरहून चुनाभट्टी परिसरात आता वळसा घालून जावं लागतं. प्रवाशांना दीड किलोमीटरचा वळसा घालून हा प्रवास करावा लागतोय. त्यामुळे वेळ आणि पेट्रोल दोन्हीही वाया जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. तर या भागातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग बंद केल्याचं वाहतूक पोलिसांनी म्हटलंय.

हा रस्ता बंद असल्यानं चेंबूरहून चुनाभट्टीला जाताना आता रिक्षासाठी 50 ते 55 रुपये मोजावे लागतायत. पूर्वी या प्रवासासाठी रिक्षाचं भाडं 35 ते 40 रुपयेच व्हायचं, असं जितेंद्र जाधव या स्थानिक रहिवाशाने सांगितलं.

Loading Comments