पी दक्षिण कार्यलयात कंत्राटी कामगारांचं उपोषण

 Goregaon
पी दक्षिण कार्यलयात कंत्राटी कामगारांचं उपोषण

गोरेगाव - पालिकेच्या पी दक्षिण घनकचरा विभागातील 17 कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा पगारच न मिळाल्यामुळे ते बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र आता कर्मचाऱ्यांचा पगार दोन दिवसात होईल असं आश्वासन शुक्रवारी पालिका अधिकाऱ्यांनी दिले आहे. यासह त्या संस्थेवर कारवाई केली जाईल, असं पालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी अजित नाईक यांनी सांगितलं.

घनकचरा विभागातील हैदराबाद पॅटर्नमध्ये 17 कंत्राटी कमागार गोदावरी दुबे यांच्या संस्थेत कामाला होते. संस्थेने गेल्या तीन महिन्यांपासून पगारच न दिल्यामुळे कर्मचारी वर्गाचे आतोनात हाल झाले होते. तेव्हा कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या जी. ओ. मकवाना यांना वांरवार तक्रार करून देखील याची दखल पालिकेने घेतली नसल्याने कंत्राटी कामगारांनी पी दक्षिण कार्यलयातच उपोषणाला बसले होते.

 

Loading Comments