नाल्याच्या गाळामुळे नागरिक त्रस्त

 Dharavi
नाल्याच्या गाळामुळे नागरिक त्रस्त

कुंभारवाडा - सी विभागातील कुंभारवाडा कचरामुक्त व्हावा यासाठी कचऱ्याच्या डब्ब्यांचं वाटप केलं जातं. मात्र दुसरीकडे रहिवासी आणि दुकानदारांना नाल्यातून काढलेल्या गाळाचा रोज सामाना करावा लागतोय. चार नाल्यातून काढलेला गाळ आणि कचऱ्यामुळे रहिवाशी त्रस्त झालेत. मंदिरा समोरच हा ढीग पडलेला आसतो. पालिकेची गाडी सकाळी पडलेला कचरा उचलण्यासाठी रात्री येते. तर कधी-कधी तो कचरा उचललाही जात नाही. मागील अनेक महिन्यांपासून हीच स्थिती आहे. याकडे नगरसेवक आणि पालिका कर्मचारी कानाडोळा करत असल्याचं निदर्शनात आलंय. यासंदर्भात तक्रार करूनही पालिका याकडे लक्ष देत नाही असं दुकानदार शांतीलाल जैन यांनी सांगितलं.

Loading Comments