कामा इस्टेटला अनधिकृत पार्किंगचा विळखा

 Goregaon
कामा इस्टेटला अनधिकृत पार्किंगचा विळखा

गोरेगाव - अनधिकृत पार्किंगमुळे गोरेगाव पूर्वेकडील कामा इस्टेट भागतले रहिवासी आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

या ठिकाणी कामा इस्टेट कंपनी, पेट्रोल पंप आणि झोपडपट्टी आहे. त्यामुळे दिवस-रात्र या रस्त्यावर रहदारी असते. अनेकदा वाहतूक कोंडीही होते. काही महिन्यांपासून येथे बंद पडलेल्या रिक्षा, कार उभ्या करण्यात आल्या आहेत. त्या वाहनांचा वापर गर्दुल्ले नशा करण्यासाठी करू लागलेत. याबाबत महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप इथले रहिवासी संतेाष धाबाडे यांनी केलाय.

याबाबत वाहतूक पोलीस अधिकारी बी. कदम यांनी सांगितलं की, या वाहनांवर लवकरच कारवाई केली जाईल.

Loading Comments