• रहेजातील विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम
SHARE

वांद्रे - स्वच्छ भारत अभियानांतर्गत शनिवारी वांद्र्यातील रहेजा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्कायवॉकची सफाई केली. एमएमआरडीएनं कोट्यवधी रुपये खर्चून स्कायवॉय बांधले. मात्र या स्कायवॉकची सफाईच होत नसल्यानं त्यावर मोठ्या प्रमाणात घाण जमा होते आहे. या महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी रोज याच स्कायवॉकवरून जा-ये करतात. त्यामुळे एमबीएच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा भाग म्हणून ही सफाई मोहीम हाती घेतली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या