रस्त्यावर थुंकणाऱ्यांच्या खिशावर 'क्लिनअप'ची नजर

कुर्ला (प.) - क्लिनअप मार्शलनी सध्या मुंबईकरांच्या खिशावर 'क्लिनअप अभियान' सुरू केले आहे. रस्त्यावर आणि बसस्टॉपवर थुंकणाऱ्या नागरिकांना पावती न देता क्लिनअप मार्शलकडून वसूली सुरू आहे. हे ‘मुंबई लाइव्ह’ने केलेल्या स्टिंगमधून उघडकीस आलं आहे. इतकंच नाही तर हे क्लिनअप मार्शल या नागरिकांना पोलिसांकडे नेण्याची धमकीही देतात. त्यामुळे नागरिकही भीतीने पैसे देतात.

Loading Comments