Advertisement

पॅनकार्ड क्लबमधील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार


पॅनकार्ड क्लबमधील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार
SHARES

गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या 'पॅनकार्ड क्लब लिमिटेड' या कंपनीची संपूर्ण मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. काँग्रेसचे सतेज पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्यांनी हे उत्तर दिलं.


'आरोपींना लवकरच अटक होईल'

याप्रकरणी सेबी आणि आर्थिक गुन्हे विभाग एकत्रित कारवाई करत आहे. या कंपनीची तीन हजार कोटींची मालमत्ता सेबीने तर पंधराशे कोटी रुपयांची मालमत्ता आर्थिक गुन्हे विभागाने जप्त केली आहे. तसंच सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपीचा मृत्यू झाल्याने अद्याप अन्य आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. लवकरच या आरोपींना अटक करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.


'यावर सरकारकडून कारवाई सुरू'

या कंपनीने 51 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं सांगत फसव्या जाहिरातींवर सरकारने कारवाई सुरू केल्याचंही मुख्यंमत्री म्हणाले. या कंपनीच्या 34 स्थावर मालमत्ता सेबीने जप्त केल्या असून सदर मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सेबीमार्फत सुरू असल्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलं. या पार्श्वभूमीवर गुंतवणूक संरक्षण कायद्यात अनेक बदल प्रस्तावित असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा