Advertisement

Virar hospital fire : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.

Virar hospital fire : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
SHARES

विरार विजय वल्लभ हॉस्पिटलमधील आगीर होरपळलेल्या १३ रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ लाख आणि गंभीर जखमींना १ लाखाची मदत जाहीर केली आहे.

याशिवाय वसई-विरार महापालिकेकडून पाच लाखाची अशी दहा लाखांची मदत करण्यात येणार असल्याचं राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख, जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री ३ ते ३.३० च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समोर आलं आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असंही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसंच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.



हेही वाचा

Virar Hospital Fire : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा