Advertisement

तुम्ही रस्त्यावर कर्तव्य बजावता, म्हणून आम्ही सण उत्साहाने साजरे करतो- मुख्यमंत्री


तुम्ही रस्त्यावर कर्तव्य बजावता,  म्हणून आम्ही सण उत्साहाने साजरे करतो- मुख्यमंत्री
SHARES

तुम्ही अहोरात्र दक्ष राहता, जबाबदारी घेता म्हणून आम्ही आमचे सण उत्साहाने साजरे करतो, त्यासाठी तुमचे धन्यवाद, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत आभार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्तालयात नववर्षाचे स्वागत केले. तसेच कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्त्वाला डाग लागणार नाही, याची मला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचाः- 'शिवशाही' कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर

 यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही सतत ताणतणावात असता नववर्षाची सुरुवात माझ्या बहाद्दर कुटुंबीयांच्या समवेत उपस्थित राहून करावी, या जाणिवेने मी महाराष्ट्र आणि मुंबईतील नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. तुम्हाला हे वर्षच नाही तर पुढील अनेक वर्षे सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि ताणमुक्ततेची जावो, अशी प्रार्थना करतो. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती जी काही नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात फ्रण्टलाईनवर लढताना अनेक पोलीस शहीद झाले. कोरोनाचे संकट आल्यावर आपण लॉकडाऊन केले. वर्क फ्रॉम होम, सर्वाना सांगितले घरातून काम करा. क्षणभर विचार करा, पोलिसांनी वर्क फ्रॉम होम पोलिसांनी केले असतं तर काय झाले असते? पण तसे झाले नाही. म्हणून आता जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे ती त्यांच्यामुळेच. पोलिसांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे. त्यामुळे बदनामी करणा-यांची तोंडे बंद झाली, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचाः- मनसेचा मोर्चा आता डॉमिनोजकडे

पोलीस दलाची बदनामी करणा-यांची तोंडे बंद झाली. कारण तुमच्या कर्तृत्वाला तोड नाही. ही परंपरा १००-१५० वर्षांपासूनची आहे. तुमचे कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाएवढे मोठे आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा