Advertisement

मनसेचा मोर्चा आता डॉमिनोजकडे


मनसेचा मोर्चा आता डॉमिनोजकडे
SHARES

मराठीत भाषेवरून अ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला मोर्चा आता  पिझ्झा आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजकडं वळवला आहे. डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेनं केली आहे. डॉमिनोजच्या प्रशासनानं मनसेच्या या मागणीची दखलही घेतली आहे. आम्ही लवकरच अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन डॉमिनोजनं मनसेला पत्राद्वारे दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेनं अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी आंदोलन सुरु केलं होतं. सुरुवातीला मनसेनं पत्रं, इशारे आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून या मुद्द्याचा पाठपुरावा केला. मात्र, अ‍ॅमेझॉननं याविरोधात न्यायालयात धाव घेत राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसे प्रचंड आक्रमक झाली होती.

मनसेने मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये अ‍ॅमेझॉनची कार्यालयं आणि गोदामांची तोडफोड करण्याचा सपाटा लावला होता. मनसेच्या या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉननं शरणागती पत्कारत ७ दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं होतं. हा सर्वप्रकार पाहता डॉमिनोजनं अगोदरच मनसेसमोर शरणागती पत्कारल्याचं चित्र दिसत आहे.

अ‍ॅमेझॉन, स्विगी , झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनंदेखील आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि डॉमिनोजला पत्र देणारे मनसे उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांना पत्र देऊन आपण मराठीत अ‍ॅप्लिकेशन सुरू करणार असल्याचं स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा