Advertisement

अक्सा बीचवर ३ सांपाना जीवदान


अक्सा बीचवर ३ सांपाना जीवदान
SHARES

एखाद्या ठिकाणी साप आढळल्यास मुंबईतले सर्पमित्र तातडीनं त्या ठिकाणी धाव घेऊन सापाला वाचवतात. मात्र, गणपती विसर्जनासाठी मालाडमधील अक्सा बीचवर तैनात सुरक्षा रक्षकाने चौपाटीवर आढळेल्या ३ सापांना पकडून ते सुखरूपरित्या जंगलात नेऊन सोडले. नथुराम सुर्यवंशी असं या जीवरक्षकाचं नाव असून त्यांनी माणसांच्या जीव वाचवण्यासोबतच वन्यजीवाचेही प्राण वाचवल्याने त्यांचं कौतुक होत आहे.




कधी आढळले साप?

मुंबईतल्या मालाड येथील अक्सा बीचवर दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी साप आढळला होता. तर, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी कोब्रा जातीचा नाग आढळाला होता. त्यानंतर ५ दिवसांच्या विसर्जनावेळी पुन्हा धामन जातीचा साप आढळला. साप दिसताच भाविकांची पळापळ होते आणि काही भाविक कुठलाही विचार न करता थेट सापाचे प्राण घ्यायचा प्रयत्न करतात.

हे लक्षात घेऊन बीचवर तैनात जीवरक्षक नथुराम यांनी हे तिन्ही साप दिसताच वेळी तिथं धाव घेऊन त्यांना पकडलं आणि पुढील अनर्थ टाळला. हे तिन्ही साप वन विभागाच्या परवानगीने जंगलात नेऊन सोडण्यात आले आहेत.



हेही वाचा-

पाच दिवसांच्या बाप्पाचं सोमवारी विसर्जन, चौपाट्या सज्ज

दीड दिवसाच्या गणेश मूर्तीत यंदा ४ हजारांनी घट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा