Advertisement

मुंबई उपनगरात पुन्हा थंडी; किमान तापमानात घट


मुंबई उपनगरात पुन्हा थंडी; किमान तापमानात घट
SHARES

मुंबईसह उपनगरात थंडी वाढली असून, मुंबईकरांनी उबदार कपडे घालणं पसंद केलं आहे. मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात बदल घडत आहेत. दिवसा ऊन रात्री थंडी असं काहीसं वातावरण मुंबईत आहे. दरम्यान, उपनगरातील किमान तापमानातील घट या आठवड्यात कायम असून, शुक्रवारी मोसमातील सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आले.

उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यातील विशेषत: उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होत आहे. मुंबईत उपनगरात किमान तापमान आठवड्याच्या सुरुवातीस २० अंशाखाली घसरले. २ दिवसांपूर्वी ते १५ अंशापर्यंत पोहचले, शुक्रवारी त्यामध्ये आणखी घट होऊन सांताक्रूझ केंद्रावर १४.८ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले.

या मोसमात प्रथमच किमान तापमान १५ अंशाखाली गेले असून, ते मोसमातील सर्वात कमी किमान तापमान आहे. शनिवारी त्यामध्ये फार मोठा बदल अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. मात्र त्यानंतर त्यामध्ये हळूहळू वाढ होऊ शकते असे अनुमान आहे.

सांताक्रूझ केंद्रावर तापमानात घट झाली असली तरी कुलाबा केंद्रावर किमान तापमान स्थिर असून १७.५ अंश राहिले. किमान तापमानात घट झाली असताना शुक्रवारी दोन्ही ठिकाणी कमाल तापमान एक अंशाने वाढले असले तरी ते ३० अंशाखाली आहे.

३ दिवसांपूर्वी मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक अति वाईट स्तरावर होता, शुक्रवारी त्यात थोडी सुधारणा होऊन तो वाईट स्तरावर आला. सर्वाधिक प्रदूषण मालाड आणि कुलाबा येथे नोंदविण्यात आले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा