महाविद्यालयातच मिळणार विद्यार्थ्यांना लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स

 Mumbai
महाविद्यालयातच मिळणार विद्यार्थ्यांना लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स
Mumbai  -  

मुंबई - राज्यातील सर्व महाविद्यालयात विद्यार्थांना दुचाकी आणि चारचाकी वाहतुकीचा शिकाऊ परवाना अर्थात लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विद्यार्थ्यांच्या वाहतूक परवान्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 16 जानेवारीपासून होणार आहे. मुंबईच्या किर्ती महाविद्यालयापासून या योजनेला सुरुवात होईल.

Loading Comments