Advertisement

महापालिकेच्या समिती सभागृहातील काच कोसळली, २ अधिकारी जखमी

मुंबई महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहाच्या छताजवळील काच कोसळल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिकेच्या समिती सभागृहातील काच कोसळली, २ अधिकारी जखमी
SHARES

मुंबई महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहाच्या छताजवळील काच कोसळल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका मुख्यालयात स्थापत्य समिती (शहर)ची बैठक सुरू होती. त्यावेळी अचानक ही काच कोसळली. या घटनेत स्थापत्य समिती अध्यक्ष प्रीती पाटणकर आणि पालिका चिटणीस विभागातील २ अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत.

बैठक तहकूब

मुख्यालयातील या घटनेनंतर तात्काळ स्थापत्य समितीची बैठक तहकूब करण्यात आली. तसंच, मुख्यालयाच्या दवाखान्यामधील डॉक्टरांमार्फत जखमींवर उपचार करण्यात आले. हा सर्व प्रकार बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.

चौकशीचे आदेश

काही वर्षांपूर्वी या इमारतीच्या नूतनीकरणाचं काम टप्प्याटप्प्यानं हाती घेण्यात आलं. नूतनीकरणाचं काम पूर्ण झालेल्या दुसऱ्या मजल्यावर २ समिती सभागृहं उभारण्यात आली. ५ वर्षांपूर्वी या सभागृहांचं उद्घाटन करण्यात आले. सभागृहातील काच कोसळल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. ही घटना घडल्यानंतर तात्काळ महापालिकेच्या देखभाल विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

फायबरचा पत्रा

सभागृहाच्या छताजवळ बसविलेल्या काचा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र काचेऐवजी फायबरचा पत्रा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभागृहाच्या शेजारील सभागृहात बुधवारी दुपारी ३ वाजता सुधार समितीची बैठक सुरू झाली. या सभागृहातही छताजवळ मोठ्या काचा बसविण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

आर्थिक तोटा टाळण्यासाठी एसटी महामंडळ करणार 'या' उपयायोजना

डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा