Advertisement

KEM मधील 6 वॉर्डांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश

असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले

KEM मधील 6 वॉर्डांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयाला जाऊन भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रुग्णालयातील अनेक अधिकारी उपस्थित होते.

केईएम रुग्णालयातील सहा वॉर्डांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामात लक्ष घालावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा केईएम रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.

रुग्णालयातील विविध विभागांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. केईएम हे ९७ वर्षे जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयातील सुविधा अद्ययावत करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईएम रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

तसेच विविध वॉर्डांची आणि तेथील सुविधांची माहिती घेतली. दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. येत्या दोन दिवसांत रुग्णालयातील सहा वॉर्डांचे काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी 400 ते 450 रुग्णांवर उपचार करता यावेत, यासाठी हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

काही रुग्णांनी आर्थिक समस्यांबाबत माहिती दिली, पैशाअभावी कोणाचेही उपचार थांबणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले आहे. येथील रुग्णांना दर्जेदार दूध देण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबई मेट्रो 2 बी मार्गावर गर्डरचे यशस्वी बांधकाम

मुंबई मेट्रो 2 बी मार्गावर गर्डरचे यशस्वी बांधकाम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा