कंत्राटी कामगारांचं धरणं आंदोलन

 Mumbai
कंत्राटी कामगारांचं धरणं आंदोलन

आझाद मैदान - सार्वजनिक बांधकाम मुंबई मंडळातील 300 ते 400 कंत्राटदारांची 400 कोटींची कामाची बिलं थकली असल्यामुळे मंगळवारी कंत्राटदारांनी धरणं आंदोलन केलं. 4 ते 5 वर्षांपासून बिलं थकल्यामुळे कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आलीय. तसंच येत्या 8 दिवसांत राज्य सरकारनं संपूर्ण थकलेली बिलं द्यावी, नाहीतर केलेली सर्व कामं उद्धवस्त करू असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे. जोपर्यंत प्रलंबित बिलं मिळत नाही, तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम मुंबई मंडळ विभागातील सर्व कंत्राटदारांनी असहकार पुकारला असल्याचं संघटेच्या वतीनं सांगण्यात आलंय. 

Loading Comments