Advertisement

मुंबईतील 'या' भागात कोरोना संसर्ग वेगानं पसरतोय

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, मुंबईतील काही भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत.

मुंबईतील 'या' भागात कोरोना संसर्ग वेगानं पसरतोय
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, मुंबईतील काही भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत. अशातच एक चिंतेची बाब समोर आली आहे. मुंबईतील उच्चभ्रू लोकसंख्या असणाऱ्या पालिकेच्या डी वॉर्डमधील नेपानिया, मलबार आणि पेडर रोड यांसारख्या भागात कोरोना रुग्णवाढीचा वेग १.८९ टक्के इतका आहे. त्या तुलनेत शहराचा रुग्णवाढीचा दर सरासरी १.४६ टक्के इतका आहे. याखालोखाल एच-वेस्ट वॉर्ड (वांद्रे, खार आणि सांताक्रूझ) मधील रुग्णवाढीचा दर हा १.८४ टक्के इतका आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलबार हिल भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या बहुतेक कोरोनाच्या नवीन केसेस या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून आढळणाऱ्या आहेत. परंतु या केसेसचा दर कमी आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात शहरात कोरोना रुग्णवाढीचा दर १.३४ टक्के इतका होता. यातील डी वॉर्डचा दर २.१ टक्के आणि एच-वेस्ट वॉर्डचा दर १.५५ टक्के इतका होता. सप्टेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यात डी आणि एच-वेस्टचा रुग्णवाढीचा दर १.४४ टक्के आणि १.४ टक्के इतका होता. जो एकूण मुंबईतील इतर शहरांच्या तुलनेत १.१ टक्के इतका सर्वाधिक होता.

डी वॉर्डमधील बऱ्याच उच्चभ्रू इमारतींमध्ये महापालिकेला सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले असून, प्रत्येक इमारतींमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान या भागात असणाऱ्या रशियन दूतावासाजवळील इमारतींना १९ एप्रिल रोजी अनसील करण्यात आले. तर नेपसी रोडवरील दर्या महालातील २ विंग्समध्ये कोरोनाचे १६ नवीन रुग्ण आढळल्यानं सील करण्यात आले आहे.

या भागात सर्वाधिक म्हणजे ९५ टक्के कोरोना रुग्ण इमारती भागांमध्ये आढळत असून झोपडपट्टीतील रुग्णसंख्या केवळ ५ टक्के आहे. त्यामुळे ज्या इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत तेथे कोरोनाचा मायक्रो- कंटेन्टमेंट झोन घोषित करत इमारती सील बंद केल्या आहे.

इमारतींमधील रहिवाश्यांनाही त्याची माहिती दिली आहे. दरम्यान या भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर १.३ टक्के इतका आहे. अनेक इमारतींमध्ये एक कुटुंबातील एक व्यक्ती इतर सदस्यांना कोरोना संक्रमित करत आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये येणाऱ्या घरकाम करणाऱ्या बायका आणि ड्रायव्हर्सची कोरोना टेस्ट करत असून चाचण्या वाढवल्या आहेत.

मलबार हिल भागातील कार्यकर्त्या इंद्राणी मलकानी यांनी सांगितले की, येथील नागरिक कोरोनाच्या दुसरी लाट येऊनही अद्याप कोरोना नियमांचे पालन करीत नाहीत. तसेच चेहऱ्यावर मास्क फक्त लावायचा म्हणून लावतात. अनेकदा तो मास्क चेहऱ्यावरून अनेकांनी नाकावर घेतलेला दिसतो. काही मोजलेच लोक सॅनिटायझर वापरणे करणे आणि इतर नियमांचे पालन करत मात्र बहुतांश लोक कोणतेही भीत न बाळता वावरत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा