Advertisement

'या' जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक

रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा २३ जिल्ह्यांमध्ये अधिक आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक
SHARES

राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा २३ जिल्ह्यांमध्ये अधिक आहे. राज्यात एप्रिल महिन्यात १७ लाख रुग्णवाढ झाली. याबाबत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, नाशिक, चंद्रपूर, नगर, सातारा, पालघर आणि सोलापूर या दहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सक्रि य रुग्ण अधिक असून, या जिल्ह्यांमध्ये विषाणूचा अधिक प्रभाव जाणवत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत पुणे, नागपूर आणि मुंबई या ३ जिल्ह्यांमध्ये जास्त रुग्ण आढळतात. एप्रिल महिन्यात राज्यात विक्रमी असे १७ लाख नव्या रुग्णांचे निदान झाले. एका महिन्यात एवढे रुग्ण अन्य कोणत्याही राज्यात आढळलेले नाहीत. यापैकी सात लाखांपेक्षा अधिक रुग्ण हे १० जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत.

चाचण्यांनंतर कोरोनाबाधित आढळणाऱ्यांचे (पॉझेटिव्ह) प्रमाण हे राज्यात गेल्या सात दिवसांत सरासरी २५.३८ टक्के  होते. पण राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये राज्य सरासरीपेक्षा करोनाबाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. पालघर – ३७.१० टक्के , बुलढाणा ३६.६७ टक्के , नाशिक ३६.२४ टक्के , नगर ३४.६२ टक्के , उस्मानाबाद ३४.५५ टक्के , हिंगोली ३४.१२ टक्के , नागपूर ३२.६५ टक्के , गडचिरोली ३२.१३ टक्के , ठाणे ३१.०२ टक्के , सातारा ३०.८३ टक्के , परभणी ३०.२८ टक्के , लातूर २८.४७ टक्के , सिंधुदुर्ग २८.३२ टक्के , वर्धा २८.०२ टक्के, पुणे २७.६२ टक्के , रायगड २७.२२ टक्के , नांदेड २७.२१ टक्के , बीड २६.९४ टक्के .

रुग्णासंख्या

नोव्हेंबर –   १ लाख ४३ हजार

डिसेंहर  –   १ लाख २० हजार

जानेवारी –   ९२,१७७

फे ब्रुवारी –   १ लाख ३१ हजार

मार्च    –   ६ लाख ५७ हजार

एप्रिल   –   १७ लाखांपेक्षा अधिक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा