Advertisement

मुंबईतील कोरोनाबळींची संख्या ११ हजारांहून अधिक


मुंबईतील कोरोनाबळींची संख्या ११ हजारांहून अधिक
SHARES

मुंबईत सोमवारी करोनाच्या नव्या ४६३ रुग्णांची नोंद झाली असून १२ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत ११ हजार ८ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

हेही वाचाः- अयोध्येच्या राजासाठी वर्गणी गोळा करणं हा हिंदुत्वाचा अपमान - संजय राऊत

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेने करोनाच्या चाचण्यांच्या प्रमाण वाढविल्या असून बाधित रुग्णांना विलगीकरणात ठेवले जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येत  आहे.  आतापर्यंत मुंबईतील दोन लाख ८७ हजार ३१३ जणांना करोनाची बाधा झाली आहे. रुग्णालयात उपचार घेणारे ६९३ रुग्ण सोमवारी करोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबईतील दोन लाख ६७ हजार ७०३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील सुमारे सात हजार ७५४ करोनाबाधित आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. सोमवारी राज्यात तब्बल ६ हजार ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली (patients discharged today). गेल्या काही दिवसांमधली ही सर्वात जास्त संख्या आहे. आत्तापर्यंत राज्यात १७,८९,९५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा Recovery rate हा ९४.२४वर गेला आहे. तर दिवसभरात २८३४ नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या २४ तासांमध्ये ५५ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा ३.५७ झाला आहे. तर कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही १८,९९,५२ एवढी झाली आहे.ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचं बदललेलं रुप आढळल्याने राज्यात खबरदारी घेण्यात येत असून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा