Advertisement

स्थानिक पालिका कार्यालयात जाणाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

स्थानिक पालिका कार्यालयात जाणाऱ्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

स्थानिक पालिका कार्यालयात जाणाऱ्यांची होणार कोरोना चाचणी
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. राज्य सरकारसोबतच पालिकेनंही अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही कामासाठी स्थानिक पालिका कार्यालयात जावं लागलं तर तुम्हाला कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

वास्तविक, पाण्याचे बिल भरणे, मालमत्ता कर भरणे, जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र अशा अनेक दैनंदिन कामांसाठी आपण पालिकेच्या स्थानिक कार्यालयात जातो. परंतु आता या कार्यालयांमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला कोरोना चाचणी करून घ्यावी लागेल. दुहेरी लसीकरण झालेल्यांचीही चाचणी घेतली जात आहे

मुंबईतील कांदिवली परिसरात पाण्याचे बिल भरणे, मालमत्ता कर भरणे, जन्म किंवा मृत्यूचा दाखला यासारख्या कामांसाठी पालिकेच्या आर दक्षिण प्रभागात येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांचीही कोरोना चाचणी केली जात आहे.

दरम्यान, आज मंत्रालयात एक महत्वाची बैठक पार पडली. सकाळी ९ वाजता तातडीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यात नेमकी काय स्थिती आहे याचा टास्क फोर्सकडून आढावा घेतला.

राज्यात तूर्तास लॉकडाउन लावण्याचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक केले जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक कंबरडं मोडलं असताना आणि राज्याची आर्थिक स्थिती पाहता लॉकडाउन लावण्याचा सरकारचा विचार नाही अशी माहिती मिळत आहे. मात्र यावेळी मिनी लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.



हेही वाचा

बेस्टच्या तब्बल ६० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

'इतक्या' निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा