Advertisement

मॉलसह उपाहारगृहांमध्ये 'लसीकरण प्रमाणपत्र दाखवा आणि प्रवेश करा' नियम लागू

मुंबईत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमीक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे.

मॉलसह उपाहारगृहांमध्ये 'लसीकरण प्रमाणपत्र दाखवा आणि प्रवेश करा' नियम लागू
SHARES

मुंबईत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमीक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. पालिकेने अनेक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता मुंबईतील मॉलसह मोठ्या खाद्य समूहांच्या उपाहारगृहांमध्ये ‘लसीकरण प्रमाणपत्र दाखवा आणि प्रवेश करा’ या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होऊ लागली आहे.

लसीकरणाचे प्रमाणपत्र जवळ नसलेल्या, तसेच लसीकरण न केलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. तसेच पालिकेच्या पथकांकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येत असल्याने मॉल व्यवस्थापनानेही या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

राज्य सरकारनं लसीकरण झालेल्या नागरिकांनाच मॉलमध्ये प्रवेश द्यावा, असे निर्देश ऑगस्टमध्ये जाहीर केलेल्या नव्या नियमावलीत दिले होते. दरम्यानच्या काळात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येऊ लागताच या नियमाला बगल देण्यात येत होती, परंतु राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागताच या नियमाचे काटेकोर पालन होताना दिसत आहे.

मुंबईतील काही मॉलमध्ये २ लसमात्रांचे सर्टिफिकेट तपासले जात आहे. लसमात्रा घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश दिला जात आहे. एकही लसमात्रा न घेणाऱ्या किंवा सर्टिफिकेट सोबत न बाळगणाऱ्या नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत आहे.

केवळ मॉलच नाही तर कॉफी, बर्गर, पिझ्झा आणि चमचमीत पदार्थ विकणाऱ्या मोठ्या खाद्य समूहांनीही गर्दी असणाऱ्या शाखांमध्ये लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती   केली आहे. या समूहांच्या अनेक शाखा मॉलमध्ये असल्याने लसीकरण अपरिहार्य आहेच, शिवाय इतर दालनांमध्येही प्रमाणपत्रांची विचारणा होते आहे.

फोर्ट, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली आणि वर्दळ असलेल्या परिसरात या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार मॉलमध्ये जाणाऱ्यांनी दोन लसमात्रा घेणे बंधनकारक आहे. सध्या ऑमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मॉल प्रशासन याची काळजी घेत आहेच, शिवाय पालिकेचे अधिकारीही नियमांच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देत आहेत. दादर विभागातील मॉलमध्ये लसीकरणाशिवाय प्रवेश दिला जात नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा