Advertisement

अरे बापरे ! राज्यात १७८ जणांचा कोरोनाने घेतला बळी, २७८६ नवे रुग्ण

घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ४९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ५५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत,

अरे बापरे !  राज्यात १७८ जणांचा कोरोनाने घेतला बळी, २७८६ नवे रुग्ण
SHARES

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टीव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली असली, तरी राज्यात या आजाराने बळी गेलेल्यांचा आकडा ही लक्षणीय आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात १७८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आनंदाची बातमी म्हणजे राज्यात सोमवारी दिवसभरात पाच हजार ७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ४९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ५५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ६९ हजार ९९४ नमुन्यांपैकी  १ लाख १० हजार  ७४४ नमुने पॉझिटिव्ह (१६.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८९ हजार  १५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


राज्यात १७८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १४३ (मुंबई ६८, वसई-विरार २०,मीरा-भाईंदर १३, नवी मुंबई १२, ठाणे १२, पनवेल ७,  कल्याण-डोंबिवली ९, पालघर १, रायगड १), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), नाशिक-१६ (धुळे १३,जळगाव ३), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-२ (जालना २).


आज नोंद झालेल्या १७८ मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ९१ रुग्ण आहेत तर ७४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ४१ जणांच्या इतर आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १३७ रुग्णांपैकी ९५ जणांमध्ये ( ६९.३४ टक्के)  मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४१२८ झाली आहे.


आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी २९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. पूर्वीच्या कालावधीतील १४९ मृत्यूंपैकी मुंबई ६३, वसई विरार – १९, मीरा भाईंदर – १२, नवी मुंबई -१२,  धुळे -१०, ठाणे -११ ,  पनवेल -७, कल्याण डोंबिवली – ८, जळगाव – २, जालना -२, पालघर – १,सोलापूर -१ आणि रायगड -१ मृत्यू असे आहेत.


राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील


मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (५९,२९३), बरे झालेले रुग्ण- (३०,१२५), मृत्यू- (२२५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६,९१०)


ठाणे: बाधीत रुग्ण- (१८,७३२), बरे झालेले रुग्ण- (७८९०), मृत्यू- (४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,३६१)


पालघर: बाधीत रुग्ण- (२४७६), बरे झालेले रुग्ण- (७१४), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६९१)


रायगड: बाधीत रुग्ण- (१९३२), बरे झालेले रुग्ण- (१२४७), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६११)


रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (४३५), बरे झालेले रुग्ण- (२९०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२८)


सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१५६), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७३)


पुणे: बाधीत रुग्ण- (१२,४१९), बरे झालेले रुग्ण- (७२७९), मृत्यू- (४९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६४६)


सातारा:  बाधीत रुग्ण- (७५२), बरे झालेले रुग्ण- (४६१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६३)


सांगली: बाधीत रुग्ण- (२४६), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४)


कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७२९), बरे झालेले रुग्ण- (५३२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९)


सोलापूर: बाधीत रुग्ण- (१८८९), बरे झालेले रुग्ण- (६९०), मृत्यू- (१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०६६)


नाशिक: बाधीत रुग्ण- (२००६), बरे झालेले रुग्ण- (१२१४), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८८)


अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२४६), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)


जळगाव: बाधीत रुग्ण- (१७८३), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१८)


नंदूरबार: बाधीत रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०)


धुळे: बाधीत रुग्ण- (४३३), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७०)


औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२७८६), बरे झालेले रुग्ण- (१५१६), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११३५)


जालना: बाधीत रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (१७१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१)


बीड: बाधीत रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२४)


लातूर: बाधीत रुग्ण- (१८१), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२)


परभणी: बाधीत रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८)


हिंगोली: बाधीत रुग्ण- (२४२), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)


नांदेड: बाधीत रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण (१६१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०)


उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)


अमरावती: बाधीत रुग्ण- (३५१), बरे झालेले रुग्ण- (२५८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२)


अकोला: बाधीत रुग्ण- (१०२६), बरे झालेले रुग्ण- (५६८), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१५)


वाशिम: बाधीत रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३)


बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५)


यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१३७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०)


नागपूर: बाधीत रुग्ण- (१०४६), बरे झालेले रुग्ण- (६२४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१०)


वर्धा: बाधीत रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५)


भंडारा: बाधीत रुग्ण- (५०), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)


गोंदिया: बाधीत रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)


चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (५०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२)


गडचिरोली: बाधीत रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)


इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९)


एकूण: बाधीत रुग्ण-(१,१०,७४४), बरे झालेले रुग्ण- (५६,०४९), मृत्यू- (४१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टीव्ह रुग्ण-(५०,५५४)


(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १४४ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)      

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आय सी एम आर ) यांच्यावतीने मे २०२० मध्ये देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो-सर्व्हे करण्यात आला.  त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली  या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी  राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात आली असून या प्रकारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा ( ॲन्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा