Advertisement

मुंबईत कोरोनाचे 751 नवे रुग्ण, तर दिवसभरात 5 जणांचा मृत्यू


मुंबईत कोरोनाचे 751 नवे रुग्ण, तर दिवसभरात 5 जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा धोका आता अधिक वाढला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 1008 नवे रुग्ण आढळले असून मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत एकूण 7812 रुग्ण असून शुक्रवारी 751 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी 27 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 295 वर जाऊन पोहचला आहे.

मागील दिवसांमध्ये मुंबईत कोरोना मृत्यूदर खाली आला होता. मात्र, पुन्हा मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी 5 रुग्णांची भर पडली आहे.मृतांमध्ये 3 पुरुष व 2 रुग्ण महिला होत्या. एक रुग्ण 40वर्षांखालील, 2 रुग्ण 60 वर्षांवरील, तर अन्य दोन रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते.  मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 352 नवे रुग्ण आढळले असून 27 रुग्ण दगावले आहेत. तर 30 एप्रिल रोजी सर्वाधित मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. 30 एप्रिल रोजी एकूण 20 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 751 नवीन रुग्ण आढळले आहेत.

30 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे काही अहवाल आले असून, त्यात 399 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशा एकूण 751 नवीन रुग्णांची भर पडली आहे.  अशा रुग्णांची एकूण संख्या आता 10 हजार 514 इतकी झाली आहे. मुंबईत एकाच दिवसात करोनाचे 95 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण 1 हजार 567 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा