Advertisement

कोरोनाव्हायरसचा धसका, आता कंडक्टरशिवाय धावणार 'बेस्ट'

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमानुसार पुढील बसेस कंडक्टरशिवाय चालवण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाव्हायरसचा धसका, आता कंडक्टरशिवाय धावणार 'बेस्ट'
SHARES

शुक्रवारी बेस्टच्या तीन कर्मचाऱ्यांची कोरोनाव्हायरसचययी चाचणी पॉझिटिव्ह आढळली. आतापर्यंत बेस्टच्या ७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमानुसार पुढील बसेस कंडक्टरशिवाय चालवण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

ड्युटिवर असताना तीनपैकी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या, शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी बेस्ट हा एकमेव पर्याय आहे. प्रत्येक बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात. काही ठिकाणी अतिरिक्त सहाय्यक असतो.

तथापि, आतापासून केवळ बस चालक असेल. हा नियम फूड डिलिव्हरी व्हॅन आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांसाठीच्या बसेसवर लागू होईल. याव्यतिरिक्त, मंत्रालयात ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांसाठी बेस्ट बसेसच्या फेरी सुरू आहेत. त्यांना सामाजिक अंतरांच्या निकषांची काळजी घ्यावी लागेल.

बेस्ट अधिकारी म्हणतात की, सध्या कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि नागरी कामगारांना बेस्टय फेरी देत आहेत. त्यामुळे त्या दोघांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. या नवीन नियमांमुळे कर्तव्यावर मर्यादित लोक असतील. यामुळे आमच्या कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाचा फैलाव नियंत्रित करण्यात मदत करतील. आम्ही आवश्यक सेवा प्रदात्यांना आपत्कालीन सेवा पुरवत आहोत. जर बेस्टमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर आपण गतिशीलता कशी प्रदान करू शकू? संपूर्ण शहर ठप्प होईल, "

शनिवारी पहाटे कुर्ला, विक्रोळी आणि घाटकोपर इथून आलेल्या बसेस प्रत्येकी एका ड्रायव्हरसह निघाल्या. पालघर, आसनगाव, खारघर आणि बदलापूर इथून बसेस सोडण्यासाठी कर्मचारी आहेत. तथापि, वडाळा आगारात या नवीन निर्देशास विरोध दर्शवण्यात आला. तिथं शनिवारी सकाळी वाहनचालक आणि कंडक्टरनं निषेध नोंदविला. ज्यामुळे ऑपरेशन एका तासासाठी रखडले.

बेस्टच्या कामगार संघटनेनं असा आरोप केला की, मॅनेजमेंट पॉलिसीमध्ये फेरफार करण्यासाठी साथीच्या रोगाचं नाव पुढे करत आहे. बेस्टची धोरणे बदलण्यासाठी कोरोनाचं निमित्त म्हणून वापरकेला जात आहे, असा आरोप केला जात आहे.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा