Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत ११२८ नवे रुग्ण, दिवसभरात २० जणांचा मृत्यू

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६७ हजार ६३५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील२४ तासात करोनाचे ६२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Coronavirus pandemic:  मुंबईत ११२८ नवे रुग्ण, दिवसभरात २० जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे ६१ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ११२८ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- Total Lock down in Ambernath: आता अंबरनाथमध्येही ३० जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६१ रुग्ण दगावले आहेत. तर २१ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २० जून रोजी रोजी एकूण १३६ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ११२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६७ हजार ६३५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील२४ तासात  करोनाचे ६२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३४  हजार ११९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- SSC-HSC Results: जुलै अखेरपर्यंत लागणार दहावी, बारावीचा निकाल

कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात  ६१ हजार ७९३ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ६७ हजार  ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ नमुन्यांपैकी १ लाख ३५ हजार ७९६ नमुने पॉझिटिव्ह (१७.२४ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १ हजार  १८२लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ९१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ६२ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात मुंबई मनपा-२०, कल्याण डोंबिवली मनपा-१,उल्हासनगर मनपा-१, मीरा-भाईंदर मनपा-१३, पालघर-१, मालेगाव मनपा-८,पुणे-१, पुणे मनपा-९, पिंपरी-चिंचवड मनपा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-३, लातूर-१, अकोला मनपा-२

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा