Advertisement

कोरोनाशी लढा : बोरिवलीत राहणाऱ्यांसाठी विशेष हेल्पलाईन नंबर

कोरोनाव्हायरस किंवा कोरोनाव्हायरसच्या उपचारासंदर्भातील कोणत्याही सेवेची माहिती हवी असल्यास तुम्ही या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकता.

कोरोनाशी लढा : बोरिवलीत राहणाऱ्यांसाठी विशेष हेल्पलाईन नंबर
SHARES

मुंबईसह संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना संक्रमणादरम्यान सर्वात मोठी मदत म्हणजे कोरोनाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी पुरवणे होय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना हेल्पलाइन नंबर आणि वेबसाइट आधीच सुरू केल्या आहेत. या हेल्पलाईन नंबरवर आणि वेबसाईटवर कोरोनाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते. परंतु स्थानिक पातळीवर पुरवल्या गेलेल्या सेवांविषयी या वेबसाइट्स आणि हेल्पलाइनवर कोणतीही विशिष्ट माहिती नाही. म्हणून स्थानिक पातळीवर त्याची सुरुवात केली गेली आहे.

यासंदर्भात आणखी एक पाऊल पुढे टाकत बोरिवलीत राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आमदार सुनील राणे यांच्या वतीनं, बोरिवलीमध्ये राहणाऱ्यांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. या हेल्पलाइन नंबरवर तुम्हाला कोरोना संबंधित सर्व माहिती आणि मदत एकाच ठिकाणी मिळू शकेल. या हेल्पलाईनमध्ये कोरोनाशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे बोरिवलीमध्ये उपलब्ध असलेले क्वारंटाईन सेंटर, कोरोना हॉस्पिटल, नॉन कोरोना हॉस्पिटल, हेल्थ पोस्ट लाइन, कोरोना टेस्ट सेंटर, रेशन शॉप आणि इतर अनेक आवश्यक माहितीही देण्यात आल्या आहेत.

हेल्पलाइन प्रभारी जिग्नेश भट्ट म्हणतात की "हे हेल्पलाईन नंबर भारतीय जनता पार्टी आणि बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी जारी केले आहेत. या हेल्पलाईनद्वारे बोरिवलीत राहणाऱ्या सर्व लोकांना कोरोना संबंधित माहिती मिळेल. त्यासह कोरोना रोगाशी संबंधित सेवा आणि इतर आवश्यक सेवांची माहिती देखील एकाच ठिकाणी आढळतील."

कोरोनाव्हायरस किंवा कोरोनाव्हायरसच्या उपचारासंदर्भातील कोणत्याही सेवेची माहिती हवी असल्यास बोरीवली इथल्या या 9324864144/ 9324709320 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा