Advertisement

मुंबईत रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढला

गेल्या काही दिवसांत मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्यानं खाली येताना दिसत आहे.

मुंबईत रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढला
SHARES

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळं कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. या पंधरवड्यात मुंबईचा कोरोना डबलिंग रेट १५ दिवसांनी वाढला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील डबलिंग रेट ५५ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. ही परिस्थिती अशीच सुधारत राहिल्यास आरोग्य यंत्रणांवरील भार कमी होईल. गेल्या काही दिवसांत मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्यानं खाली येताना दिसत आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दिवसाला १० हजार नवे कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या १५ दिवसांत यामध्ये टप्प्याटप्प्याने घट होत हा आकडा आता ५ हजारापर्यंत येऊन स्थिरावला आहे. हे मुंबईतील परिस्थिती सुधारत असल्याचे द्योतक आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ५५४२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. ही आकडेवारी एप्रिल महिन्यात दररोज आढळणाऱ्या रुग्णंख्येमधील सर्वांत कमी आहे. मुंबईत याआधी ३१ मार्च या दिवशी ५३९४ नवे रुग्ण आढळले होते.

मुंबईमध्ये मागील काही दिवसांपूसन मृतांच्या संख्येतसुद्धा सातत्याने वाढ झाल्याचे नोंदवले गेले. आज मुंबईत एकूण ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तसेच यापैकी ३६ जण याआधीच कोणत्यातरी आजाराने ग्रस्त होते. ही माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आजच्या एकूण मृतांमध्ये २८ महिलांचा समावेश असल्याचेसुद्धा मनपाने सांगितले. आजची आकडेवारी मिळून मुंबईमध्ये मृतांचा आकडा १२७८३ वर पोहोचला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा