Advertisement

मुंबईत ३६७२ नवे कोरोनारुग्ण, ७९ जणांचा मृत्यू

मुंबईत गेल्या २४ तासांत ३,६७२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची नोंद झाली, तर ७९ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत ३६७२ नवे कोरोनारुग्ण, ७९ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत गेल्या २४ तासांत ३,६७२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची नोंद झाली, तर ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्ण दुपटीच्या कालावधीनं रविवारी सरासरी १०० दिवसांवर उसळी घेतली, तर कोरोना वाढीचा दर ०.६६ टक्क्यांवर घसरला. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ५६ हजार २०४ वर पोहोचली. ठाणे जिल्ह्यात रविवारी २ हजार ७४४ कोरोना रुग्ण आढळून आले. तर ४२ जणांचा मृत्यू झाला.

राज्यात रविवारी दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन बाधितांची नोंद झाली तर ६६९ जणांना मृत्यू झाला. दिवसभरात ५१ हजार ३५६ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ६ लाख ६८ हजार ३५३  रुग्ण उपचाराधीन आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा